गतवर्षीच्या काेयना धरणात आजच्या दिवशी इतका हाेता पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जुलै 2020

गतवर्षी याच दिवशी धरणाची जल पातळी 2059.1 फूट होती तर धरणात 21.93 टीएमसी पाणीसाठा होता.

कोयनानगर : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरूच आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाच्या सरीवर सरी कोसळत असल्याने धरणात येणा-या पाण्याची आवक वाढली आहे. धरणात 14674 क्युसेक पाण्याची आवक झाल्यामुळे गत चोवीस तासात धरणाच्या पाणीसाठय़ात दाेन टीएमसी पाणी वाढ झाली आहे. धरणात 36.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरणात यावर्षी धरणात 14 टीएमसी पाणीसाठा जादा आहे.
तुमचा घात करण्याआधी...

चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर 107 मिलीमीटर, नवजा 54 मिमी तर महाबळेश्वर येथे 117 मिमी पावसाची नोंद झाली. पाणलोट क्षेत्रात आज (मंगळवार) दिवसभर पाऊस चालुच आहे. कोयनानगर येथे 60/1165 मिमी, नवजा येथे 53/1170 मिमी तर महाबळेश्वर येथे 67/1168 मिमी पावसाची नोंद झाली.

पाणलोट क्षेत्रात पावसाने उसंत न दिल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गत चोवीस तासात दाेन टीएमसीने वाढ झाली आहे. धरणाची जलपातळी 2087.8 फूट झाली असून धरणाचा पाणीसाठा 36.22 टीएमसी झाला आहे. गतवर्षी याच दिवशी धरणाची जल पातळी 2059.1 फूट होती तर धरणात 21.93 टीएमसी पाणीसाठा होता.

कोट्यवधींचे कर्ज देण्याचे आमिष दाखविणाऱ्या पुणे, उस्मानाबाद जिल्ह्यांतील दोघांवर फसवणुकीचा साताऱ्यात गुन्हा​

स्त्रियांवरील दुष्परिणामांचा हा अँगल कोणी विचारात घेईल का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Rain Hits In Mahableshwar Koyna Dam And Satara District