शंभर दिवसांत एकही सुटी न घेणाऱ्या कोरोना फायटरवर नियतीचा घाला

शंभर दिवसांत एकही सुटी न घेणाऱ्या कोरोना फायटरवर नियतीचा घाला

नागठाणे (जि.सातारा) : कोरोनाजन्य परिस्थितीला तोंड देताना गेले 100 दिवसांत एकही सुटी न घेणारे राजेंद्र घाडगे आजही अगदी नऊ वाजताच घराबाहेर पडले. मात्र, कार्यालयात पोचण्यापूर्वीच ध्यानीमनी नसताना महामार्गावरील अपघातात क्रूर नियतीने त्यांचा बळी घेतला. 

पुणे- बंगळूर महामार्गावर वळसे (ता. सातारा) येथे झालेल्या अपघातात राजेंद्र घाडगे यांचा शु्क्रवारी (ता.26) सकाळी मृत्यू झाला. भरधाव वेगाने पाठीमागून आलेल्या मोटारीने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात महामार्गावरून सेवारस्त्यावर कोसळल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. प्रवासात घाडगे हे नेहमीच हेल्मेट वापरत असत. आजदेखील त्यांच्या डोक्‍यात हेल्मेट होते. मात्र, खाली कोसळताना झाडात त्यांचे हेल्मेट अडकले आणि अनर्थ घडला.
 
घाडगे हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात आरोग्यसेवक म्हणून कार्यरत होते. कोरोनाजन्य परिस्थितीला तोंड देताना त्यांनी गेल्या 100 दिवसांत एकही सुटी घेतली नव्हती. ते सकाळीच म्हणजे नऊ वाजता घराबाहेर पडले. मात्र, साताऱ्यात कार्यालयात पोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. घाडगे यांनी या आधी नागठाण्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दीर्घकाळ सेवा बजाविली होती. त्यामुळे नागठाणे परिसरातील विविध गावांत त्यांचा मोठा जनसंपर्क होता. 

अतीतलगत असलेले समर्थगाव हे त्यांचे गाव. उरमोडी प्रकल्पात बाधित झालेल्या चार वाड्यांनी मिळून बनलेले हे गाव. या गावासाठी त्यांनी मोठे योगदान दिले होते. निर्मल ग्राम, तंटामुक्ती, जलस्वराज्य या योजनांत गावाने यश पटकाविले होते. वनग्राम म्हणूनही गावचा गौरव झाला होता. दिल्लीतही गावाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान झाला होता. या सर्व यशात घाडगे यांची भूमिका मोलाची ठरली होती. त्यांच्या पत्नी सरिता यांनी गावचे सरपंचपदही भूषविले होते. त्यांच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


पुणे बंगळूर महामार्गावरील त्या भीषण अपघातात जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यु

प्रशासनाच्या कासव गतीने वाढविली 30 हजार युवकांची चिंता  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com