

Monsoon Intensifies in Satara; Mahabaleshwar Records Season's Heaviest Rain
esakal
सातारा : सातारा जिल्ह्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन करत गेल्या २४ तासांत सर्वदूर दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात सरासरी ४५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू मोसमातील एकूण पाऊस ८४ मिलीमीटर झाला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पावसाचा जोर कायम असताना, पूर्वेकडील काही तालुक्यांमध्ये तुलनेने कमी पावसाची नोंद झाली आहे.