

Satara Faces Growing Water Worries; Situation May Worsen If Rains Fail
sakal
सातारा: वाढलेली उष्णता, लांबलेला पाउस, उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेत केलेल्या पाणीकपातीमुळे शहरासह विस्तारित भागात गेल्या महिन्यात नागरिकांकडून जास्तीच्या पाण्याची मागणी होत आहे. यामुळे एका महिन्यापासून पालिकेने दररोज चार टँकरद्वारे ४० फेऱ्या करत नागरिकांना पाणी पुरवण्यात येत आहे. टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांची जास्तीच्या पाण्याची गरज पूर्ण होत असून, पावसाळा लांबल्यास टँकरच्या फेऱ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.