सातारा : चार नगरपंचायतींची आरक्षण सोडत होणार; कार्यक्रम जाहीर

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वडूज, खंडाळा, दहिवडी या चार नगरपंचायतींचा समावेश आहे.
Election Commission
Election Commissionsakal

कोरेगाव (सातारा) : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार डिसेंबर २०२१ मध्ये मुदत संपणाऱ्या १७, मुदत संपलेल्या दोन आणि नवनिर्मित सात अशा राज्यांतील एकूण २६ नगरपंचायतींसाठी प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम आजपासून (ता. दहा) सुरू होत असून, त्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव, वडूज, खंडाळा, दहिवडी या चार नगरपंचायतींचा समावेश आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतीच्या प्रभागांची संख्या, त्यांची प्रभागनिहाय एकूण व अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीची २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव आज (ता. दहा) जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करावयाचा आहे. या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास गुरुवारी (ता. ११) जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता द्यायची असून, त्याचदिवशी सदस्यपदाच्या आरक्षणाच्या सोडतीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व नगरपंचायतीच्या वेबसाईटसह नोटीस प्रसिध्द करावयाची आहे.

Election Commission
ST चे 918 कर्मचारी निलंबित, राज्य सरकारचा मोठा निर्णय

शुक्रवारी (ता. १२) मुख्याधिकाऱ्यांनी नगरपंचायतींच्या सदस्यपदांच्या आरक्षणाची सोडत काढावयाची आहे. त्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व त्यामधील महिला तसेच सर्वसाधारण महिला या प्रवर्गांचा समावेश आहे. त्याचदिवशी प्रारूप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्यपदांच्या जिल्हाधिकारी आरक्षणाची अधिसूचना (कलम दहा नुसार) रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागवण्यासाठी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतीच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली जाईल. त्यावर हरकती व सूचना मागवण्याचा कालावधी शुक्रवारपासून (ता. १२) मंगळवारपर्यंत (ता. १६) असून, प्राप्त हरकती व सूचनांवर बुधवारी (ता. १७) जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी करावयाची आहे.

हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देऊन जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपालिका प्रशासनाकडे गुरुवारी (ता. १८) अहवाल पाठवावयाचा असून, अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्तांनी सोमवारी (ता. २२) मान्यता द्यावयाची आहे. त्यानंतर मंगळवारी (ता. २३) जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपंचायतींच्या वेबसाईटवर अधिसूचना प्रसिद्ध करावयाची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com