

Fatal Two-Wheeler Crash on Joshi Vihir Flyover; Two Seriously Injured
Sakal
भुईंज: पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भुईंजनजीक जोशीविहीर येथे उड्डाणपुलाच्या उतारावर दुचाकीचा अपघात होऊन एक जण ठार झाला, तर दोघे जखमी झाले. अभिमन्यू अर्जुन पठारे (वय २६, रा. वर्ये, ता. सातारा) असे ठार झालेल्याचे नाव आहे, तर शुभम प्रकाश जगताप व श्रावणी कमलाकर जगताप अशी जखमींची नावे आहेत.