

सातारा : एकीव (ता. जावळी) गावच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेलवर जेवण करण्याकरिता गेलेल्या मित्रांमध्ये जोरदार राडा झाला. या भांडणात बिअरच्या बाटल्या डोक्यात फोडून एकमेकाला जिवे मारण्याचा प्रयत्न देखील झाला आहे, तसेच यावेळी नृत्यांगणांचा नाच देखील सुरू होता. याप्रकरणी प्रतीक बापूराव दळवी (रा. जकातवाडी) यांनी मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.