esakal | कुस्ती मल्लविद्या महासंघावर सागर साळुंखे
sakal

बोलून बातमी शोधा

khatav

सांगलीच्या भोसले व्यायामशाळेतील वस्ताद विष्णूपंत सावर्डेकर यांचा पठ्ठा व विसापूरचे माजी सरपंच सागर साळुंखे यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र शाखेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

कुस्ती मल्लविद्या महासंघावर सागर साळुंखे

sakal_logo
By
संजय साळुंखे

सातारा ः विसापूरचे (ता. खटाव) माजी सरपंच व युवा सामाजिक कार्यकर्ते सागर साळुंखे यांची कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या पश्‍चिम महाराष्ट्र शाखेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

सांगलीच्या भोसले व्यायामशाळेतील वस्ताद विष्णूपंत सावर्डेकर यांचा पठ्ठा असलेल्या सागरभाऊंचा यशस्वी मल्ल ते युवा सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. कुस्तीप्रमाणेच त्यांनी समाजकारणाचा वसा घेऊन काम केले. विसापूरमध्ये त्यांनी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या. जलसंधारण, स्मार्ट स्कूल आदींचा त्यात प्रामुख्याने उल्लेख होतो. स्वतःच्या गावी दरवर्षी भव्य कुस्ती मैदान भरवतात. पंचक्रोशीतील अनेक युवा मल्लांना ते कायम प्रोत्साहन देतात. कुस्ती मल्लविद्या महासंघावर निवड झाल्याने सागर साळुंखे यांचे अनेक मान्यवरांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

तब्बल 166 वर्षांपासून या गावात एक गणपतीची परंपरा 

loading image
go to top