Sajjangad Mashal Mahotsav 2026
esakal
-अमर वांगडे
परळी (जि. सातारा) : आकाशात काळोख, गडाच्या पायऱ्यांवर मशालींची रोषणाई, कानावर पडणारा हलगी-तुतारीचा निनाद आणि आसमंतात घुमणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष... अशा ऐतिहासिक आणि भक्तिमय वातावरणात किल्ले सज्जनगडावर सातवा मशाल महोत्सव उत्साहात पार (Seventh Mashal Festival at Sajjangad Fort) पडला. हजारो मशालींच्या प्रकाशाने उजळलेल्या गडावर पालखी मिरवणूक, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि साहसी अग्निखेळांनी शिवभक्तांना शिवकालीन इतिहासाच्या वैभवशाली आठवणींना उजाळा दिला.