
-हेमंत पवार
कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कामथी आणि सांगली जिल्ह्यातील विहापूर या दोन गावांच्या हद्दींची निश्चितीच करण्यात आली नव्हती. त्यामुळे दोन्ही गावांचा वाद सुरू होता. त्यासंदर्भात तहसीलदार कार्यालयातही न्यायनिवाडा सुरू होता. त्याकडे अनेक वर्षे कोणीच लक्ष दिलेले नव्हते. येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कडेगावचे तहसीलदार अजित शेलार यांच्याशी त्यासंदर्भात चर्चा करून त्यावर मार्ग काढून फैसला केला.