सातारा : वारीत वारकऱ्यांची गैरसोय होऊ देऊ नका

पालकमंत्री बाळासाहेब पाटील; संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा नियोजन बैठक
Ashadhi Wari Updates | आषाढी वारी
Ashadhi Wari Updates | आषाढी वारीsakal

सातारा : कोरोना संसर्गामुळे गेली दोन वर्षे संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. कोरोनाचा कहर कमी झाल्‍याने शासनाने यात्राजत्रा, तसेच वारीवरील निर्बंध आता शिथिल केले आहेत. दोन वर्षांच्‍या खंडानंतर होणाऱ्या पालखी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात वारकरी येण्याची शक्यता असून, त्‍याचा विचार करत नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज बैठकीदरम्‍यान केल्‍या. वारीच्‍या काळात वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, यासाठी सर्व विभागांनी संघटित काम करत दक्षता घेण्‍याचे आदेशही दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात संतश्रेष्‍ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा-२०२२ च्या अनुषंगाने आढावा बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिली होती. बैठकीसाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

श्री. पाटील यांनी वारीच्‍या अनुषंगाने आवश्‍‍यक त्‍या सूचना सर्व विभागप्रमुखांना केल्‍या. श्री. देसाई यांनी मुक्कामाच्या ठिकाणी दिंड्यांना सुरक्षितरीत्‍या तात्पुरती वीजजोडणी देण्‍याच्‍या सूचना केल्‍या. बैठकीत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्री. पाटील यांनीही सूचना मांडत त्‍यानुसार उपाययोजना राबविण्‍याची मागणी केली.

बैठकीतील निर्णय

  • पालखी तळाचे सपाटीकरण करणे.

  • तळावर मुरूम व कच टाकणे.

  • वारकऱ्यांसाठी फिरती शौचालये ठेवणे.

  • शौचालयांची सफाईसाठी यंत्रणा नेमावी.

  • शौचालयांना सुरक्षित वीज जोड द्यावेत.

  • पिण्‍याच्‍या पाण्‍याची वारंवार तपासणी करावी.

  • अखंडित वीजपुरवठ्यासाठी यंत्रणा नेमावी.

  • गर्दी नियंत्रणासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com