esakal | साताऱ्यातील सत्ता ‘ब’ नोंदीचा प्रश्‍‍न मार्गी; नागरिकांच्‍या आंदोलनाला यश
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

साताऱ्यातील सत्ता ‘ब’ नोंदीचा प्रश्‍‍न मार्गी; नागरिकांच्‍या आंदोलनाला यश

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : सातारा (Satara) शहर (City) परिसर, तसेच उपनगरात असणाऱ्या सत्ता ब मिळकतींना वर्ग एक दर्जा देण्‍याच्‍या प्रक्रियेस जिल्‍हाधिकारी (Collector) कार्यालयात वेग आला असून, पहिल्‍या टप्‍प्‍यात २० प्रकरणे निकाली निघाली आहेत. याच अनुषंगाने साताऱ्यातील मिळकतधारकांनी माजी नगरसेवक शंकर माळवदे (Shankar Malwade), शं. ग. पारेख (S. C. Parekh) यांच्‍या नेतृत्‍वाखाली आंदोलन केले होते. या प्रकरणी ‘सकाळ’ (Sakal) ने वारंवार पाठपुरावा केला होता.

सातारा शहर आणि उपनगरात सत्ता ‘ब’ प्रकारातील अनेक मिळकती असून, त्‍यांचा महसुली वर्ग बदलण्‍याबाबतचे शासनाचे आदेश होते. या आदेशानुसार अनेक मिळकतींचा महसुली वर्ग बदलण्‍यात आला होता. मध्‍यंतरीच्‍या काळात या कामकाजास शासनाने स्‍थगिती दिली होती. या विरोधात शंकर माळवदे व इतरांनी शासनाकडे पाठपुरावा केला. यामुळे शासनाने या मिळकतींचा महसुली वर्ग बदलण्‍याची कार्यवाही पुन्‍हा सुरू केली होती. या अनुषंगाने साताऱ्यातील मिळकतधारकांनी त्‍यासाठीचे अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयाकडे केले होते. अर्ज करूनही त्‍याबाबतची कार्यवाही होत नसल्‍याने मिळकतधारकांनी नुकतेच जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. याच प्रकरणांचा ‘सकाळ’ ने सातत्‍याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

हेही वाचा: पिंपरी : पाणीपुरवठ्यासाठी नागरिकांचे निगडीत आंदोलन

नागरिकांचे आंदोलन आणि ‘सकाळ’चा पाठपुराव्‍यामुळे सत्ता ‘ब’ मिळकतीचा महसुली वर्ग बदलण्‍याची प्रक्रियेने वेग घेतला आहे. सद्यःस्‍थितीत २० प्रकरणे मार्गी लागली असून, उर्वरित ११० प्रकरणांचे शासकीय मूल्य भरून घेण्‍यासाठीचे आदेश जिल्‍हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. याबाबतची माहिती श्री. माळवदे यांनी पत्रकाद्वारे दिली. मिळकतींचा वर्ग बदलण्‍याची मुदत येत्‍या सहा महिन्‍यांत संपुष्‍टात येणार असून, ती मुदतवाढ करून घेण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयाने शासनाकडे पाठपुरावा करण्‍याची मागणीही पत्रकात माळवदे यांनी केली आहे.

loading image
go to top