esakal | उन्‍हाळी सुटीचा आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून शाळा सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

online education

उन्‍हाळी सुटीचा आजचा शेवटचा दिवस; उद्यापासून शाळा सुरु

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनाचा (coronavirus) फैलाव रोखण्‍यासाठी अवलंबलेल्‍या उपाययोजनांमुळे शाळांचे प्रत्‍यक्ष शैक्षणिक (education) कामकाज बंद ठेवत विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन (omline education) अभ्‍यासक्रम शाळांनी (schools) पूर्ण करून घेतले. अभ्‍याक्रमपूर्तीनंतर उन्‍हाळी सुटी (summer holidays) सोमवारी संपवून सर्वच शाळा यंदाचे शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून (ता. १५) ऑनलाइन सुरू करत आहेत. यंदाच्‍या शैक्षणिक वर्षाची सुरुवात ऑनलाइन होत असल्‍याने विद्यार्थ्यांअभावी (students) शाळा परिसर यावेळी देखील सुनासुना राहणार आहे. (satara-school-reopens-tuesday-online-education-marathi-news)

गतवर्षी कोरोनाचा फैलाव रोखण्‍यासाठी शासनाच्‍या आदेशानुसार राज्‍यातील शैक्षणिक कामकाज ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करून घेण्‍यात आले. अभ्‍यासक्रम पूर्ण झाल्‍यानंतर गुणश्रेणीच्‍या आधारे निकाल जाहीर करत शाळांनी विद्यार्थ्यांचा पुढील इयत्तेचा अभ्‍यासक्रम ऑनलाइन पद्धतीनेच सुरू केला. यंदाचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीनेच पार पडले असून, त्‍यात घेण्‍यात आलेले उपक्रम, चाचण्‍या, विद्यार्थी ऑनलाइन उपस्‍थिती, गृहभेटीदरम्‍यान शिक्षकांनी नोंदविलेल्‍या शेऱ्यांच्या आधारे पार पडलेल्‍या शैक्षणिक वर्षाचे निकाल शाळास्‍तरावर तयार करण्‍यात आले आहेत. उन्‍हाळी सुटीत निकालपत्रके तयार करत असतानाच शाळांनी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू केली होती. शासनाच्‍या यापूर्वीच्या पत्रकाच्‍या आधारे यंदाचे शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सुरू होत आहे. यासाठीची तयारी शाळास्‍तरावर पूर्ण झाली आहे. सोमवार हा शैक्षणिक वर्षातील उन्‍हाळी सुटीचा शेवटचा दिवस असून, मंगळवारी सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षाची उत्‍सुकता विद्यार्थ्यांना लागून राहिली आहे.

हेही वाचा: चिंताजनक! सातारा अद्याप 'डेंजर झोन'मध्ये'

सद्य:स्‍थितीत सातारा जिल्ह्यात चार लाख ९४ हजार इतके प्राथमिक आणि माध्‍यमिक विद्यार्थी असून, त्‍यांचे स्‍वागत मंगळवारी शाळास्‍तरावर ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यादिवशी अभ्‍यासासाठीच्‍या सूचना विद्यार्थ्यांना देण्‍यात येणार असून, त्‍यानंतर पाठ्यपुस्तकांतील धड्यांच्या लिंकआधारे कामकाजास सुरुवात होणार आहे.

शैक्षणिक क्षमतेची शिक्षक करणार पडताळणी

पडताळणी शैक्षणिक कामकाज सुरू करत असतानाच शिक्षकांना विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्‍तर काय आणि कसा आहे, याची चाचपणी करण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. पुढील वर्षात प्रवेश करताना गतवर्षीच्‍या शैक्षणिक अभ्‍यासक्रमातील संकल्पना विद्यार्थ्यांना स्‍पष्‍ट झाल्‍या आहेत का, त्‍याने अपेक्षित शैक्षणिक क्षमता मिळवल्‍या आहेत का, याचीही पडताळणी शिक्षकांना करावी लागणार आहे.

nursery school

nursery school

अभ्‍यासाच्‍या लिंक आजपासूनच

शासनाच्‍या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष मंगळवारपासून सुरू होणार असले तरी अनेक मोठ्या शिक्षण संस्‍थांनी सुरू होणाऱ्या अभ्‍यासक्रमाच्‍या लिंक आजपासून (साेमवार) विद्यार्थ्यांना पाठविण्‍याचा निर्णय घेतला आहे. यानुसार त्‍यांनी विद्यार्थ्यांना त्‍याबाबतच्‍या सूचना पाठविल्‍या आहेत.

हेही वाचा: काळजी घ्या! महिनाभरात 2600 मुलांना काेराेनाची बाधा

ब्लाॅग वाचा

loading image
go to top