काळजी घ्या! महिनाभरात 2600 मुलांना काेराेनाची बाधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

children

काळजी घ्या! महिनाभरात 2600 मुलांना काेराेनाची बाधा

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोना संसर्गाच्या (coronavirus) दुसऱ्या लाटेमध्ये बालकांनाही (childrens) विळखा वाढला आहे. गेल्या दोन महिन्यांत सातारा जिल्ह्यातील तीन हजारांहून अधिक बालके कोरोनाग्रस्त (covid19) झाली आहे. त्यातही फक्त एप्रिल महिन्यात जिल्ह्यात तब्बल दोन हजार 602 बालके कोरोनाबाधित (corona infected) झाली आहेत. त्यामुळे बालकांना हाताळताना पालकांनी अधिक काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. (satara marathi news covid19 childrens infected covronavirus trending)

जिल्ह्यात मार्च महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली आहे. या लाटेत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. दरराजे दोन हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनाबाधित येत आहेत. शहराशहरामध्ये व गावागावांत कोरोनाचे अनेक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांना बेड उपलब्ध होत नाहीत, अशी परिस्थीती आहे. या संसर्गाचा प्रसार वेगाने होत एकाच कुटुंबातील अनेक जण बाधित निघण्याचे प्रमाण पहिल्या लाटेपेक्षा या वेळी वाढले आहे. त्याचबरोबर मागील लाटेत लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण नगण्य होते. त्यामुळे कुटुंबातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा होता; परंतु या लाटेने लहान मुलांनाही कोरोनाने टार्गेट केले आहे. त्यातही मागील महिन्यात लहान मुले बाधित होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.

हेही वाचा: राज्यावर गडद संकट! मानसिक तणावातून आत्महत्या, बाधितांना आधाराची गरज

दुसऱ्या लाटेतील मार्च व एप्रिल महिन्यातील 0 ते 14 वयोगटातील कोरोना बाधितांचा आकडा पाहता एकूण तीन हजार 22 बालके बाधित झाली आहेत. त्यामध्ये मार्च महिन्यात केवळ 418 या वयोगटातील बालके बाधित झाली आहे, तर एप्रिल महिन्यातच दोन हजार 602 बालके बाधित झाली आहे. जिल्ह्यामध्ये मागील मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला. तेव्हापासूनचा विचार करायचा झाल्यास केवळ आठ हजार 585 मुले बाधित झाली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यातील लहान मुले बाधित होण्याचा आकडा नक्कीच चिंताजनक आहे. लहान मुले बाधित होण्याचा हा वेग जिल्ह्याला परवडणारा नाही. मुळात जिल्ह्यात लहान मुलांचे एकही कोरोना केअर सेंटर नाही. त्यामुळे बालकांना अन्य कोरोना बाधितांबरोबरच राहावे लागते. त्याचबरोबर कोरोनाबाधित लहान मुलांची प्रकृती बिघडल्याने उपचारासाठी दाखल करायचे झाल्यास खासगी दवाखान्यांमध्ये स्वतंत्र सुविधा नाही. शासकीय पातळीवर त्याची जिल्हा रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे; परंतु ती व्यवस्थाही केवळ 20 बेडचीच आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लहान मुले बाधित व्हायला लागली, तर ही यंत्रणा अपुरी ठरू शकते. त्यामुळे लहान मुले बाधित न होण्यासाठी पालकांची जबाबदारीही वाढली आहे. त्याचबरोबर लहान मुलांची प्रकृती गंभीर झाल्यास त्यांच्यावर योग्य उपचार होण्यासाठी आणखी यंत्रणा उभारण्यासाठीही प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्‍यक आहे.

सातारा जिल्ह्यातील अपडेट वाचा

लहानमुले बाधित होण्याची संख्या

मार्च 2021 : 418

एप्रिल : 2,602

एकूण : 8,585

हेही वाचा: लहान मुले ठरु शकतात सुपर स्प्रेडर; सिव्हीलसह 'चिरायू'त उपचार

हेही वाचा: तंत्र आणि सुटकेचा मंत्र

पालकांनी काय करावे...

लहान मुलांना खेळण्यासाठी घराबाहेर सोडू नये.

लहान मुलांना वस्तू आणण्यासाठी बाहेर पाठवू नये.

घराबाहेर जाणाऱ्या नातेवाइकांच्या संपर्कात मुले येऊ देऊ नयेत.

लहान मुलांना हाताळताना आईनेही मास्कचा वापर करावा.

समज आलेल्या मुलांना हात धुणे व सॅनिटाईज करण्याची माहिती द्यावी.

Web Title: Satara Marathi News Covid19 Childrens Infected Covronavirus

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Satara
go to top