
सातारा : गणेशोत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने चाकरमान्यांची गावांकडे जाण्यासाठी बसस्थानकावर गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत आहे. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने (एसटी) जादा बस सोडण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ११ आगारांतून लांब पल्ल्यांच्या व जिल्ह्यांतर्गत अशा एकूण २०० हून अधिक जादा बस सुटणार आहेत. यामध्ये कोकणच्या चाकरमान्यांसाठी जादा फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.