esakal | संवेदशील गाव; पण कोरोना संकटात दाखवली एकी
sakal

बोलून बातमी शोधा

man

राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या दहिवडी शहरात "एक गणपती'ची प्रतिष्ठापना करण्याचे ठरले. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणाने व शांततेत साजरा करण्याचे एकमुखी ठरवण्यात आले. 

संवेदशील गाव; पण कोरोना संकटात दाखवली एकी

sakal_logo
By
रुपेश कदम

दहिवडी : राजकीयदृष्ट्या संवेदनशील व माण तालुक्‍याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरात एक गाव, एक गणपतीचा नारा घुमला. 

सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांची गणेशोत्सवाच्या अनुषंगाने बैठक बोलावली होती. या बैठकीस नगराध्यक्ष सतीश जाधव, माजी सभापती अतुल जाधव, युवा नेते सिध्दार्थ गुंडगे आदी उपस्थित होते. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता गणेशोत्सव साधेपणाने व शांततेत साजरा करण्याचे आवाहन श्री. भुजबळ यांनी केले. यावेळी सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, कार्यकर्त्यांनी सकारात्मक मते मांडली. गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करून आपल्याच नागरिकांचे आरोग्य व जीव धोक्‍यात घालणे योग्य नाही, असे सर्वांचे मत आले. सर्वच मंडळांनी पुढाकार घेऊन सर्वानुमते शहरातील सिद्धीविनायक मंदिरात गणेशाची स्थापना करून एक गाव, एक गणपती उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे पोलिस प्रशासन व नागरिकांनी स्वागत केले. 

या बैठकीस नगरसेवक समीर योगे, नगरसेवक प्रशांत शिंदे, विकास जाधव, संदीप महाडिक, तेजस पवार, निखिल शिंदे, ऍड. मिनेश पाटील, अभिजित चव्हाण आदींसह शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

तब्बल 166 वर्षांपासून या गावात एक गणपतीची परंपरा

loading image
go to top