कोरेगाव शहरासाठी सात कोटींचा निधी

koregaon
koregaon
Updated on

सातारा (जि. सातारा) ः विधानसभा निवडणुकीत कोरेगाव शहराने भरभरून साथ दिल्याने कोरेगावचा विकास करणे हे कर्तव्य आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व महसूल राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सहकार्यामुळे कोरेगाव शहरामधील रस्ते आणि गटारांच्या कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. 

या सर्व विकासकामांना नुकतीच मंजुरी मिळाली आहे. याबाबतची माहिती श्री. शिंदे यांनी दिली. कोरेगावातील सर्व रस्ते ट्रिमिक्‍स कॉंक्रिटचे होणार असून त्याचा दर्जा हा महानगरपालिकेतील कॉंक्रिटचे रस्त्याच्या दर्जाच्या बरोबर असणार आहे. त्यामुळे कोरेगाव शहराचा आश्वासक विकास होईल. संपूर्ण कोरेगाव शहरातील भविष्यातील रस्ते हे अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे केले जातील. त्यातून शहराचा चेहरा-मोहरा बदलेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कोरेगाव मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आल्यामुळे या मतदारसंघातील जास्तीत जास्त कामे मार्गी लागतील, अशी माहिती त्यांनी दिली. 

मंजूर झालेली कामे... 
शांतीनगर परिसर, श्रीकांत बर्गे यांच्या घरापासून ते रहिमतपूर रोडपर्यंत ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-40 लाख. भगवा चौक व अयोध्या कॉलनीदरम्यान ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-40 लाख. गोसावी हॉस्पिटलसमोरील रस्ता ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-2 कोटी. बाजारपेठ, गावठाणदरम्यान भुयारी गटारे व रस्ते ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-3 कोटी 25 लाख. भारत पेट्रोल पंपापासून सरळ ते कन्याशाळा परिसरापर्यंत ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-30 लाख. सागर दोशी यांचे घर ते रहिमतपूर रोडपर्यंत ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-25 लाख. गोसावी वस्तीपासून ते अरुण बर्गे यांच्या घरापर्यंत ट्रिमिक्‍स कॉंक्रिटीकरण-40 लाख. 


आगामी काळात कोरेगाव शहरासाठी महत्त्वाची पाणीपुरवठा योजना किंवा शहरातील तिळगंगा नदीपात्राचे सुशोभीकरण आदी अनेक प्रकल्प मार्गी लावणार आहे. 

- महेश शिंदे, आमदार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com