कोरोनाचं संकट लवकर दूर कर; गृहराज्यमंत्र्यांचं ब्रह्मचैतन्य महाराजांना साकडं

राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
गृहराज्यमंत्र्यांचं ब्रह्मचैतन्य महाराजांना साकडं
गृहराज्यमंत्र्यांचं ब्रह्मचैतन्य महाराजांना साकडं sakal
Updated on

गोंदवले : राज्यावरील कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे केली असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाधी मंदिरात होणारा यंदाचा पुण्यतिथी महोत्सव शिस्तीने पार पडेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.

गोंदवले बुद्रुक येथील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी तसेच थोरले श्रीराम मंदिरात गृहराज्यमंत्री देसाई हे आई व बंधूंसह आज दर्शनासाठी आले होते. दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिर परिसराची पाहणी करून येथील व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले. मंत्री देसाई म्हणाले, ‘‘गोंदवल्यात समाधी दर्शनासाठी राज्यासह दर्शभरातून भाविक येतात.

गृहराज्यमंत्र्यांचं ब्रह्मचैतन्य महाराजांना साकडं
जनरल बिपीन रावत आमच्यासाठी हीरो आहेत : लेफ्टनंट कृष्णकांत केतकर

येथील मंदिर व्यवस्थापनाने कोरोना काळात नियमांचे काटेकोरपणे पालन करून भाविकांना समाधी दर्शनाची चांगल्या प्रकारे सोय उपलब्ध करून दिली आहे. मंदिर व परिसरात शिस्त व स्वच्छतेबाबत खूप चांगले नियोजन करण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात सुरुवातीपासून समाधी मंदिर व्यवस्थापनाने योग्य नियोजन करून सामाजिक बांधिलकीसुद्धा जपली आहे. दुसऱ्या लाटेनंतर आता कोरोनाच्या तिसऱ्या ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या लाटेची भीती असल्याने येत्या काही दिवसांत येथे साजरा होणारा श्रींचा पुण्यतिथी महोत्सवदेखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करूनच करावा लागणार आहे.

त्यादृष्टीने प्रशासनाकडून पाहणी करून कार्यवाही केली जाईल. येथे दर्शनासाठी येणाऱ्या भविकानीही गर्दी टाळून प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावे, हीच प्रार्थना श्री महाराजांच्या चरणी केली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com