esakal | कोयनेच्या पावसात शेखर सिंह ओले चिंब; उलट्या धबधब्यावर २५ पर्यटकांवर कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Shekhar Singh

कोयनेच्या पावसात शेखर सिंह ओले चिंब; २५ पर्यटकांवर कारवाई

sakal_logo
By
विजय लाड, यशवंतदत्त बेंद्रे

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना पर्यटनक्षेत्र (tourism) पर्यटकांसाठी खुले झाल्यावर येथील मुसळधार पावसाचा आनंद घेत कोयनानगर (koynanagar) गजबजून गेले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह (shekhar sinh) यांनीही रविवारी सहकुटुंब कोयनेत येऊन पावसात निसर्गसंपन्न कोयना पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. (satara-shekhar-singh-koynanagar-tourism-marathi-news)

गतवर्षापासून कोरोनामुळे पर्यटनक्षेत्र लॉक आहे. याचा फटका कोयना येथील पर्यटन क्षेत्रालाही बसला आहे. पावसाळा आला की निसर्गसंपन्न कोयना पर्यटनाला बहर येतो. येथे सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथील धबधबे पर्यटकांना खुणावत आहेत. पर्यटकांचे आकर्षण ओझर्डे धबधबाही कोसळत असल्याने नेहमीच पर्यटकांनी हाऊसफुल असतो. पर्यटन खुले झाल्याने पावसात चिंब होण्यासाठी पर्यटकांची पावले कोयनेत रविवारपासूनच वळली आहेत.

हेही वाचा: पावसाळ्यातील पर्यटनाचे आगार कोयनानगर

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही रविवारी सहकुटुंब निसर्गाचा आनंद लुटला. ओझर्डे धबधबा परिसरात पावसात ओले चिंब भिजण्याची इच्छा त्यांनी पूर्ण केली. मी जिल्हाधिकारी म्हणून नाही तर पर्यटक म्हणून आलो आहे. अतिशय मनमोहक व सुंदर असणारे कोयनानगर युनोस्कोच्या जागतिक नेटवर्क ऑफ बायो स्फीअर रिझर्व्हचा भाग असून वन्यजीव विभागाने सुंदररित्या विकसित केलेला हा परिसर आहे. या ठिकाणी ब्रेड अँड ब्रेकफास्ट योजना चालू करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

हेही वाचा: महाबळेश्‍वर पाचगणी खूले; प्रेक्षणीय स्थळे राहणार बंद

दरम्यान पहिल्याच पावसात सडावाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी तरुणाईची पावले तिकडे वळली. मात्र, तेथे पोलिसांनी करडी नजर ठेवली आहे. तारळे विभागातील निसर्गसौंदर्य खुलते. विभागात विविध प्रकारचे नयनरम्य व मन मोहवून टाकणारे नजारे आहेत. यात सर्वाधिक लोकप्रिय व प्रसिध्द झालेला सडावाघापूरच्या उलट्या धबधब्याचा प्रथम क्रमांक लागतो. विस्तीर्ण पठार, हिरवा गालिचा, धुक्याची चादर अन्‌ पावसाचे तुषार सोबत डोळ्यांचे पारणे फेडणारा उलटा धबधबा व त्याच्या कारंज्यात भिजण्याचा मोह आवरता आवरत नाही. पावसाळा सुरू झाला की तरुणाईला वेध लागतात. यात तरुणीदेखील मागे नाहीत.

हेही वाचा: आपल्या दोन हातात लाखो घरांना प्रकाशमय करण्याची ताकद आहे, बेटा!

बुधवारपासून पावसाला सुरुवात झाली आणि पठारावर तरुणाई अवतरू लागली. येथील फौजदार अनिल पाटील यांनी उलटा धबधबा सडावाघापूर येथे फिरायला गेलेल्या २५ व्यक्तींवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून १५ हजारांचा दंड वसूल केला आहे. पहिलीच कारवाई असल्याने केवळ दंडात्मक तरतूद करून सोडून देण्यात आले आहे. यापुढे सरसकट गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे उलटा धबधब्याला जाणाऱ्यांनो आधी गाठ पोलिसांशी पडणार आहे.

काही सुखद बातम्या वाचा

loading image
go to top