

Senior Revenue Officer Attacked in Satara; Investigation Underway Into Motive
sakal
सातारा : सातारा शहरात निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यावर काही युवकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सातारा शहर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित युवकांना ताब्यात घेतले आहे. मारहाणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.