

Scorching Summer Ahead: Satara Records 38°C, Heat Alert Issued
sakal
सातारा: जिल्ह्यात मार्चअखेरीस उन्हाचा तडाखा वाढला असून, तापमानाचा पारा ३६ ते ३८ अंशांवर पोहोचला आहे. वाढत्या उष्णतेने नागरिक हैराण झाल्याने उन्हाच्या तीव्र झळा झाल्याने दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसत आहे. सकाळपासूनच कडक ऊन जाणवत असून, दुपारी त्याची तीव्रता अधिक वाढत आहे. एप्रिल आणि मे महिन्यात ही दाहकता आणखी वाढून तापमान ४२ ते ४५ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे येणारे दिवस अधिक उष्ण राहणार आहेत.