...तर पाटण तालुक्‍याच्या सीमा सील?

patan
patan

कोयनानगर (जि. सातारा) ः लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात पाटण तालुक्‍यात बहुतांश मुंबई, पुणेवासीय भूमिपुत्रांची घरवापसी झाली आहे. सध्या तालुक्‍यात कोरोनाचे बाधित रुग्ण वाढत असल्याने चिंतेची बाब झाली आहे. पाटण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनू नये, यासाठी गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत पाटण तालुक्‍याच्या सीमा सील कराव्या की अन्य काही पर्यायाचा स्वीकार करावा, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. 

कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यावर कोयना विभागातील कराटे गावाची पाहणी श्री. देसाई यांनी केली. त्यावेळी प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार समीर यादव, पाटण ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक चंद्रकांत यादव, गटविकास अधिकारी मीना साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक महेश भाविकट्टी, सरपंच पांडुरंग सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, सुदर्शन वायकर, पांडुरंग बेबले आदी उपस्थित होते. 

यावेळी श्री. देसाई म्हणाले, ""मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी असणारे 70 हजार लोक पाटण तालुक्‍यात आले आहेत. अजून बाहेर असणारे लोक येत आहेत. ज्यांच्याकडे येण्याचा पास आहे, असे लोक गावात आले तर त्यांना थेट क्वारंटाइन करावे. विनापास जे आले असतील, त्यांच्यावर कारवाई करावी.'' 


पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक शाळेच्या इमारती गळक्‍या आहेत. किती शाळांचे पत्रे बदलणे गरजेचे आहे, याची माहिती प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावी. या शाळांचे पत्रे तातडीने बदलण्याची कार्यवाही करावी. 

- शंभूराज देसाई, गृहराज्यमंत्री, पाटण 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com