

Maharashtra News Satara Soldier Sangram Khamkar Passes Away Four Months Before Retirement After Two Decades of Service
esakal
सातारा : देशाच्या सीमेचे रक्षण करताना आयुष्याची वीस वर्षे देशसेवेसाठी समर्पित केली... निवृत्तीचे अवघे चार महिने शिल्लक राहिले होते. त्यानंतर कुटुंबासोबत निवांत आयुष्य जगण्याची स्वप्ने रंगवली जात होती. मात्र, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पश्चिम बंगालच्या सीमेवर कर्तव्य बजावण्यासाठी जात असतानाच साताऱ्यातील सोनवडी गावच्या जवानावर काळाने घाला घातला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जवान संग्राम रामदास खामकर (वय ४०) यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संपूर्ण सोनवडी गावावर शोककळा पसरली असून, एका कुटुंबाचा आधार आणि गावाचा अभिमान हरपला आहे.