काेराेना वाॅरिअर्स शिक्षकांनाही 50 लाखांचे विमाकवच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 1 June 2020

शासनाने 29 मे 2020 दरम्यान घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांसह आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.

सातारा : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारणाच्या कामांसाठी शिक्षकांच्या नेमणुका रुग्ण सर्वेक्षण, पोलिस मित्र, अन्नधान्य वितरणावर निरीक्षक, विलगीकरण कक्षावर व्यवस्थापकसह अनेक बाबींसाठी कोरोना योद्धा म्हणून इतर कर्मचाऱ्यांसह शिक्षक काम करत होते. आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण शासनाने लागू करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शसनाकडे केली होती.
 
आरोग्य कर्मचाऱ्यासह अनेक कर्मचाऱ्यांना शासनाने विमासंरक्षण दिले होते; परंतु शिक्षकांना विमा संरक्षण देण्यात आलेले नव्हते. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, तसेच शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात नियुक्त शिक्षकांना विमा संरक्षण लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून, तसेच संघटनांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने 29 मे 2020 दरम्यान घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षकांसह आपत्ती व्यवस्थापनात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना 50 लाखांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे.
 
संघटनेच्या मागणीचा विचार करून शासनाने विमा संरक्षण लागू केल्याबद्दल राज्यध्यक्ष देविदास बसवदे, सचिव कल्याण लवांडे, सहसचिव तथा जिल्हाध्यक्ष दीपक भुजबळ, सरचिटणीस उद्धव पवार, नेते गणेश जाधव, उपाध्यक्ष कृष्णत हिरवळे, राज्य संघटक रजनी चव्हाण, शहनाज तडसरकर, उपसरचिटणीस बी. वाय. दोडमणी आदींनी शासन निर्णयाचे स्वागत करून शासनाचे आभार मानले आहे.

गोंदवल्यात संकटकाळी जपला श्रींचा वारसा

Lockdown5 सातारा जिल्हावासियांसाठी असा आहे नवा आदेश


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara State Government Covered Teachers By Fifty Lakhs Rupees Insurance