
सातारा : सातारा शहरासह परिसरातील विविध भागांतील बंद टपऱ्या आणि वाहने हटविण्याची मोहीम सलग दुसऱ्या दिवशीही पालिकेच्या वतीने सुरू ठेवण्यात आली. दुसऱ्या दिवशीच्या मोहिमेदरम्यान हुतात्मा चौकातील सहा टपऱ्या आणि एक हातगाडा अतिक्रमण हटाव पथकाने जप्त केला.