सातारा : ऊस संपेपर्यंत कारखाने सुरू ठेवा ; खासदार उदयनराजे भोसले

साखर आयुक्‍तांना केल्‍या सूचना
उदयनराजे भोसले
उदयनराजे भोसलेsakal

सातारा: यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम संपत आला तरीही अद्याप जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ऊस उभाच आहे. उभ्या उसाची तोड पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे चालू गाळप थांबवू नये तसेच त्‍याशिवाय कारखाने बंद होणार नाहीत, यासाठीचे नियोजन करण्‍याच्‍या सूचना खासदार उदयनराजे भोसले यांनी साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांना दूरध्‍वनीवरून केल्‍या. याचवेळी त्‍यांनी शेतात उभा असणाऱ्या उसाचे गाळप करण्‍यासाठी गाळप सुरू असलेल्या कारखान्यांना उद्दिष्ट देण्‍याची मागणीही त्‍यांनी केली.

सातारा जि‍ल्‍ह्या‍त दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसाची लागण केली जाते. यंदाचा गाळप हंगाम उशिरा सुरू झाल्‍याने तसेच इतर तांत्रिक कारणांमुळे जि‍ल्‍ह्याच्‍या विविध भागातील शेतांत अजूनही ऊस उभा आहे. या प्रकरणी लक्ष घालत तोडगा काढण्‍याची विनंती शेतकऱ्यांनी उदयनराजे भोसले यांना केली होती. यानुसार त्‍यांनी आज साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांच्‍याशी याप्रश्‍‍नी दूरध्‍वनीव्‍दारे चर्चा करत त्‍यांना लेखी निवेदनही पाठवून दिले.

चर्चेदरम्‍यान उदयनराजेंनी श्री. गायकवाड यांना सूचना करत त्‍यानुसार नियोजन करण्‍यास सांगितले. पत्रकात म्‍हटले आहे की, ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचे तोडणी, गाळपाबाबत काही शंका-समस्या असतील, त्यांनी नाव, गाव, ऊस लागवड क्षेत्र, नेमकी समस्या काय आहे, याबाबतची संक्षिप्त माहिती जलमंदिर येथील कार्यालयात लेखी देण्‍याची विनंती केली आहे. यामुळे भागनिहाय आढावा घेऊन होणारे नुकसान टाळण्‍यासाठीच्‍या उपाययोजना राबविता येतील, असा विश्‍‍वासही त्‍यांनी पत्रकात व्‍यक्‍त केला आहे. चर्चेदरम्‍यान केलेल्‍या मागणीबाबत सकारात्‍मक निर्णय घेण्‍याचे आश्‍‍वासन श्री. गायकवाड यांनी उदयनराजे भोसले यांना दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com