

Sugarcane Farmers Protest in Satara Against 3800 Rupees Rate Unions Burn Price Letter at Three Locations
esakal
कऱ्हाड ः ऊसाचा पहिला हप्ता ३८०० रुपये सातारा जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी जाहीर केला आहे. मात्र ३९०० अधिक १०० रुपयांच्या मागणीवर शेतकरी संघटना ठाम असुन जोपर्यंत तो दर मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार संघटनांनी केला आहे. त्यामुळे संघटनांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन देण्यात आलेल्या ऊसदराच्या पत्राची संघटनांनी होळी केली. त्याचबरोबर आज शहापुर (ता. कऱ्हाड), नवारस्ता (पाटण), शिवथर (ता. सातारा) येथे आंदोलन करण्यात आले. तर जरंडेश्वर कारखान्यासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असुन अद्यापही त्यावर तोडगा निघाला नसल्याचे जिल्हाध्यक्ष राजु शेळके यांनी सांगीतले.