पुसेगावच्या उपसरपंचपदी सुरेखा जाधव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीमुळे महाराष्ट्रासह परराज्यातही प्रसिध्द असलेल्या खटाव तालुक्‍यातील पुसेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुरेखा केशव जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

पुसेगाव (जि. सातारा) ः पुसेगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सुरेखा केशव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या धोरणानुसार रिक्त झालेल्या उपसरपंच जागेवर ही निवड करण्यात आली. 

सरपंच मनीषा पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवडणुकीत उपसरपंचपदासाठी सुरेखा जाधव यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलाधिकारी व्ही. आर. तोरडमल यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. सभेस ग्रामपंचायत सदस्य व देवस्थानचे विश्वस्त रणधीर जाधव, सुनीलशेठ जाधव, प्रकाश जाधव, चंद्रकांत जाधव, रोहन देशमुख, वैभव भोसले, अनिल बोडके, मंगल जाधव, दीपाली मुळे, सीमा जाधव, शोभा मसणे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, नवनिर्वाचित उपसरपंच सुरेखा जाधव यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जनशक्ती संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक व माजी सरपंच ऍड. श्रीकृष्ण जाधव, माजी प्राचार्य ए. डी. जाधव, अंकुशराव पाटील, संदीप जाधव, भरत मुळे, विक्रम जाधव, महादेव जाधव, जे. टी. जाधव, दादा गोरे, घनश्‍याम मसणे, यशवंत चव्हाण, श्रीकांत पवार, आण्णा जाधव, मनोज नलवडे, अविनाश रणशिंग, सागर नलवडे, ग्रामसेवक एन. एम. नाळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. 

 

सातारा जिल्ह्यात या 393 गावांत कोरोनाचा शिरकाव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Surekha Jadhav as Deputy sarPanch of Pusegaon