
लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या सुरू केला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यभर जागर आंदोलन करण्यात आले.
सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून दिल्ली येथे आंदोलन सुरू केले आहे. तरीही केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर भजन, कीर्तन करत जागर आंदोलन केले.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, रमेश पिसाळ, संजय जाधव, जनार्दन आवारे, हणमंत जाधव, संदीप पाटील, मनोज जाधव, सुनील जाधव आणि कार्यकर्ते उपस्थित होते. श्री. शेळके म्हणाले, ""केंद्र सरकारने तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. ही विधेयके शेतकरी विरोधी असल्याने पंजाब, हरियाना व इतर काही राज्यांतील शेतकरी केंद्र सरकार विरोधात रस्त्यावर उतरला आहे.
दुष्काळाने हाेरपळलेले चंद्रहारांनी दहा हजारांत संत्र्याचे मिळविले पाच लाख
क-हाडात रात्रभर टाळ वाजवून स्वाभिमानीने छेडले जागर आंदोलन
त्यामुळे लाखो शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या सुरू केला आहे. या आंदोलक शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील शेतकरी असल्याने केंद्र सरकारच्या विरोधात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने राज्यभर जागर आंदोलन करण्यात आले.''
Edited By : Siddharth Latkar