Satara Crime: 'गहाळ झालेले ७६ मोबाईल हस्तगत'; सातारा तालुका पोलिसांची कारवाई; ११.४० लाखांचा मुद्देमाल
Major Breakthrough: सीईआयआर पोर्टलचे काम पाहणारे कर्मचारी व गुन्हे प्रकटीकरण पथकाला निर्देश दिले होते. त्यानुसार या पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे परजिल्हा व परराज्यातून ११ लाख ४० हजार रुपये किमतीचे ७६ मोबाईल हस्तगत केले.
सातारा : तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले सुमारे ११ लाख ४० हजार रुपये किमतीचे ७६ मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत. हे मोबाईल नागरिकांना परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.