तन्वीचे उत्तुंग यश; एका डोळ्यात हसू, तर दुसऱ्यात आसू

patan
patan

कोयनानगर (जि. सातारा) ः कोयना विभागातील कामरगावातील सामान्य कुटुंबातील तन्वी विजय चाळकेने 99.80 टक्के गुण मिळवले. दोनच दिवसांपूर्वी चाळके कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना तन्वीच्या यशाने तन्वी व चाळके कुटुंबाच्या एका डोळ्यात आसू तर एका डोळ्यात हसू, अशी अवस्था होती. 

चाळके कुटुंबातील तन्वीचे पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण कोयनानगरातील नेताजी सुभाषचंद्र हायस्कूलमध्ये आहे. काही कारणांमुळे तिला पुढील शिक्षण पाटणमधील माने-देशमुख विद्यालयातात घ्यावे लागले. अनेक अडचणींवर मात करत तन्वीने परिस्थितीशी तोंड देत दहावीच्या परीक्षेत 99.80 टक्के गुण मिळवले. 

निकाल जाहीर होण्याच्या दोन दिवस अगोदर तन्वीच्या मोठ्या चुलतीचे अकस्मात निधन झाले. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणाऱ्या चाळके कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. हा आघात कोसळला असतानाच तन्वीचा दहावीचा निकाल हाती आला. त्यात तन्वीने मोठे यश संपादन केले. त्यामुळे तन्वी व चाळके कुटुंबीयांच्या एका डोळ्यात आसू असताना तन्वीने राज्य पातळीवर मिळवलेल्या यशामुळे दुःख मनात ठेऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले होते. 


माझ्या शिक्षणासाठी कष्ट घेणाऱ्या पालकांच्या स्वप्नांची, कुटुंबाची व परिश्रम घेणाऱ्या शिक्षकांची माझ्याकडून स्वप्नपूर्ती झाली आहे. मला इंजिनिअर व्हायचे असून, त्यासाठी माझा संघर्ष सुरू आहे. 

- तन्वी चाळके, कामरगाव 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com