Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

Satara Teacher Propose Girl Student : साताऱ्यात एका शिक्षकाने शाळेतील १५ वर्षीय विद्यार्थीनीलाच व्हॅलेंटाइन डे दिवशी प्रपोज केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी शिक्षकाविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल झाली आहे.
 Satara Teacher Allegedly Proposes Student

Satara Teacher Allegedly Proposes Student

Updated on

अल्पवयीन मुलीचा शाळेतील शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार व्हॅलेंटाइन डेदिवशी उघडकीस आला. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून शिक्षकावर गुन्हा नोंद झाला आहे. राजेंद्र कसबे असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. पीडित मुलीचं वय १५ वर्षे इतकं असून व्हॅलेंटाइन डे दिवशी तिला प्रपोज करणाऱ्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांकडूनच विद्यार्थीनीला प्रपोज केल्याच्या प्रकाराने आता खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com