अतिक्रमणधारकांशी "त्यांचे' लागेबांधे, उंब्रजला पाटण तिकाटण्यावरील स्थिती

Satara
Satara

उंब्रज (जि. सातारा)  : पाटण ते पंढरपूर राज्यमार्गावर येथील पाटण तिकाटणे येथे अनेक वर्षांपासून राज्यामार्गाच्या कडेला टपऱ्यांचे अतिक्रमण आहे. बांधकाम विभागातील काही लोकांशी त्यांची अर्थपूर्ण तडजोड होत असल्याने ती अतिक्रमणे हटवली जात नाहीत. त्या टपऱ्यांच्या रस्त्यालगतच्या रांगा अपघातांसह वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना झाल्यानंतरच बांधकाम विभागाचे डोळे उघडणार की काय, असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त होतो आहे. 

पाटण, मल्हारपेठ, चाफळकडील वाहने व मालवाहतूक करणारी वाहने येथे थटतात. ती वाहने त्या चौकात अस्ताव्यस्त असतात. त्यामुळे ते पार्किंग वाहतूक कोंडीला आमंत्रण देत आहे. त्या भागातून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेअन चालत जावे लागते आहे. त्यामुळे अपघात होत आहेत. वाहनधारकांसह अतिक्रमणधारकांच्या मुजोरपणाचा त्रास सामान्यांना सहन करावा लागतो आहे.

सायंकाळी मुंबईकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचाही हा चौक पार्किंग झोनच बनला आहे. त्यामुळे राज्यामार्ग कळत नाही. येथील अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई होत नाही. त्यांच्याशी बांधकाम विभागाचे आर्थिक हितसंबंध आहेत. त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. अनधिकृत टपऱ्या बांधकाम विभाग काढणार कधी, हाच खरा प्रश्न आहे. 

बड्यांचाही वरदहस्त 

राज्यमार्गावर असणाऱ्या अनधिकृत टपरीच्या मालकांना येथील बड्या धेंडांचा वरदहस्त आहे. यामुळे हे टपरीमालक अरेरावीची भाषा करतात. आमचे कोणी काहीही करू शकत नाही, अशा अविर्भावात आहेत. याकडे पोलिस प्रशासनासह संबंधित विभाग लक्ष देणार का, असा सवाल नागरिक करत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com