"ते' आले... जेवले... गप्पा मारल्या अन्‌...

khatav
khatav
Updated on

पुसेगाव (जि. सातारा) ः येथील 35 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचा अहवाल बुधवारी (ता. 8) आल्यानंतर येथे लॉकडाउनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाच सातारा येथे वास्तव्यास असलेली पुसेगाव येथील कोरानाबाधित 65 वर्षांची व्यक्ती येथील तीन कुटुंबांच्या संपर्कात आल्याने पुसेगावकरांत भीतीचे वातावरण आहे. विसापूरमध्येही एका कोरोनाबाधिताचा संपर्क आला असून पुसेगाव व विसापूर ही दोन्ही गावे कंटेनमेंट झोन करण्यात आली आहेत. 

मूळची पुसेगाव येथील परंतु सध्या शाहूनगर-सातारा येथे वास्तव्यास असलेली ही व्यक्ती पाच जुलैला पुसेगावला येऊन गेली होती. या व्यक्तीचा येथील तीन कुटुंबांशी संपर्क आला होता. अंगात ताप असतानाच त्याकडे दुर्लक्ष करून ते पुसेगावला आले होते. या तीनपैकी एका कुटुंबात त्यांनी जेवण केले होते. दुसऱ्या कुटुंबात त्यांनी चहापान केला तर तिसऱ्या कुटुंबाशी त्यांचे केवळ संभाषण झाले होते. त्रास होत असल्याने त्यांना साताऱ्यात खासगी डॉक्‍टरांकडे गेले होते. त्यावेळी डॉक्‍टरांनी त्यांना कोविडची तपासणी करून घ्या व मगच ऍडमिट होण्याचा सल्ला दिला होता. त्याप्रमाणे गुरुवारी (ता. 9) सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला. रात्री दहा वाजता ते कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला. तत्पूर्वी पावणेदहाच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. 

कोरोनाबाधित महिलेच्या पहिल्या अहवालानंतर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाची या घटनेनंतर धावपळ सुरू झाली असून या तीन घरांतील व्यक्तींचा सर्व्हे करण्यात येत आहे. त्यांचे जेवण व चहा-पाणी झालेल्या दोन्ही कुटुंबांत एकूण 12 व्यक्ती असून तिसरे कुटुंब लोरिस्कमध्ये आहे. या हायरिस्कमधील दोन्ही कुटुंबांना पुसेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून तिसरे कुटुंब होम क्वारंटाइन केले असल्याचे पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुजर यांनी सांगितले. 


विसापूरमध्येही प्रतिबंधात्मक उपाययोजना 
कोरेगावातील एका खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाबाधित चालक हा पाच जुलै रोजी विसापूर येथे येऊन गेल्याने विसापूर गावही प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या दोन्ही गावांतील कुटुंबांचा सर्व्हे तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वत्र औषध फवारणी करण्यात येत आहे. 

(संपादन ः संजय साळुंखे) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com