esakal | सातारा : शेतमालावर चोरट्यांचा डल्ला !
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

सातारा : शेतमालावर चोरट्यांचा डल्ला !

sakal_logo
By
राजेंद्र शिंदे

खटाव : सध्या घेवडा पिकाला दर वाढल्याने घेवडा उत्पादकांना दिलासा मिळाला असाला तरी शेतातील घेवडा सुरक्षित राहिलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून खटाव (Khatav) परिसरातील अनेक शेतकर्यांच्या (Farmer) शेतातील काढणीला आलेला घेवडा चोरून नेल्याच्या घटना वारंवार घडत असल्याने खळबळ उडाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास अतिशय शिताफिने घेवडा चोरून नेण्याचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांची (Farmers) डोकेदुखी वाढली आहे.

येथील अनेक शेतकर्यांची उपजीविका शेतीवर चालते. कोरोना महामारी व निसर्गाचा लहरीपणामुळे सातत्याने अडचणीत सापडणार्या शेतकर्यांपुढे आपले हातातोंडाशी आलेल्या पीकाची चोरी होण्याचे नवे संकट उभारले आहे. प्रचंड भांडवल गुंतवून, वेळप्रसंगी कर्ज काढून व दिवसरात्र कष्ट करून आपले आर्थिक घडी सुरळीत करत असताना त्याने पिकवलेल्या शेती पिकांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे ही चक्रावून टाकणारी बाब आहे.

यापूर्वी चोरटे घरांना किंवा दुकानांना लक्ष्य करीत होते. तथापि अलिकडे चोरट्यांनी चोरी करण्याची नवीन पध्दत अवलंबली आहे. रात्रीच्या वेळी शेतात राखण करण्यासाठी कुणीही नसते. नेमक्या याच बाबीचा फायदा घेऊन शेतमालावर हात मारण्याचा नवा फंडा चोरट्यांनी अवलंबला आहे.सध्या बाजारात घेवड्याला कधी नव्हे असा दर मिळत आहे.शेतकर्यांमध्ये त्यामुळे आनंदाचे वातावरण होते. मात्र चोरट्यांचा रात्रीस खेळ चालत असल्याने हा आनंद फार काळ टिकू शकला नाही.

चोरटे रात्रीच्या अंधारात एका,एका शेतातून अंदाजे अर्धा ते एक एकर शेतातील घेवड्यावर रातोरात हात मारल्याच्या घटना वारंवार घडू लागले आहे.

हेही वाचा: खटावात वाघा घेवड्याला विक्रमी क्विंटलला 12 हजार दर

अलिकडे घेवड्याला सोन्याचा भाव आला आहे. मात्र त्यामागे संकटही तेवढेच वाढले आहे. एक तर घेवड्याच्या शेंगा भरणीच्या ऐन भरात पावसाने ओढ दिली. त्यामुळे उत्पादनात बरीच घट आली. त्यातही जे काही हाताला लागणार होते त्या पिकावरही आता चोरटे डल्ला मारू लागल्याने शेतकर्यांची आवस्था इकडे आड न तिकडे विहीर अशी झाली आहे व परिसरात चोरट्यांच्या या नवीन चोरीच्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.

loading image
go to top