esakal | खटावात वाघा घेवड्याला विक्रमी क्विंटलला 12 हजार दर; शेतकऱ्यांत समाधान
sakal

बोलून बातमी शोधा

Wagha Ghevda

गेल्या तीन ते चार वर्षांतील वाघा घेवड्याचे दर पाहता यावर्षी घेवड्याने दराच्या बाबतीत उच्चांक गाठला आहे.

खटावात वाघा घेवड्याला विक्रमी क्विंटलला 12 हजार दर

sakal_logo
By
सुहास शिंदे

पुसेसावळी (सातारा) : गेल्या तीन ते चार वर्षांतील वाघा घेवड्याचे दर पाहता यावर्षी घेवड्याने दराच्या बाबतीत उच्चांक गाठला असून, घेवडा प्रति क्विंटल १२ हजार रुपयांपर्यंत गेल्याचे दिसून येत आहे. खटाव तालुक्यातील (Khatav Taluka) पुसेसावळी परिसर हा वाघा घेवडा (Wagha Ghevda) उत्पादनात अग्रेसर असून, परिसरातील वडगाव, चोराडे, रहाटणी, लाडेगाव, पारगाव, गोरेगावात घेवड्याची जास्त प्रमाणात पेरणी केली जाते.

यंदा घेवड्यासह अन्य पिकांची पेरणी वेळेवर झाली. मात्र, मध्यंतरी पावसाने (Heavy Rain) उघडीप दिल्याने खरीप पिकांना चांगला फटका बसल्याचे दिसून आले आहे. घेवड्याचे एकरी सात ते दहा क्विंटल उत्पादन निघते. यंदा मात्र, एकरात दोन ते तीन क्विंटल उत्पादन निघाल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला असला तरी घेवड्याच्या दराने नवा उच्चांक म्हणजे जवळपास क्विंटला १३ हजार गाठल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा: 'कृषी'तील कार्याबद्दल शरद पवारांनी केलं यशवंतराव, मालोजीराजेंचं कौतुक

मध्यंतरीच्या काळात पुसेसावळी परिसर म्हणजे घेवडा उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर असायचा. मात्र, काळाच्या ओघात घेवड्याची जागा सोयाबीन, आले, मूग, उडीद या नगदी पिकांनी घेतल्याने परिसरातील घेवडा पेरणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. याही वर्षी घेवड्याची जेमतेम पेरणी असल्याने त्याचबरोबर पेरणीनंतर निसर्गाची अवकृपा झाल्याने घेवडा उत्पादक शेतकऱ्यांना म्हणावेसे उत्पन्न निघालेले नाही. मात्र, घेवडा दराने उच्चांक केल्याने आता उसापेक्षा घेवडा बरा, म्हणण्याची वेळ आली आहे. कारण यावर्षी घेवढ्याने तब्बल दहा हजारांचा आकडा ओलांडत प्रति क्विंटल १२ हजार रुपये एवढा दर मिळवला आहे.

हेही वाचा: कसबा पेठ गणपतीचा इतिहास

उसाचे उत्पादन एक वर्षानंतर मिळते. मात्र, घेवडा हा तीन महिन्यांत उत्पादित होतो. यावर्षी घेवड्याचा दर दहा हजार प्रति क्विंटलपेक्षा जास्त झाल्याने शेतकरी वर्ग समाधानी आहे.

-सूरज पवार, शेतकरी, पारगाव

यंदा घेवडा पेरणी कमी प्रमाणात झाली होती. त्याचबरोबर घेवड्याचे उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांना कमी उतार मिळाला आहे. तरीही दहा ते १२ हजार रुपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळतो आहे.

-नितीन वीर, घेवडा व्यापारी, पुसेसावळी

loading image
go to top