

“Satara gears up for the four-day Granth Mahotsav at Zilla Parishad Ground — a treat for book lovers and literature enthusiasts.”
Sakal
सातारा : सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्या वतीने येत्या सात नोव्हेंबरपासून जिल्हा परिषदेच्या मैदानावर उभारण्यात येणाऱ्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे नगरीत ग्रंथमहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी दिली. दहा नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या ग्रंथमहोत्सवात ग्रंथदिंडी, परिसंवाद, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा समावेश आहे.