
सातारा : जिल्हा रुग्णालयात होत असलेल्या कॅथलॅबसाठी आवश्यक असणारी उद्वाहक यंत्रणा, विद्युत पुरवठ्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नातून ७१ लाख ५८ हजार ५३५ रुपये निधीला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे सुसज्ज कॅथलॅब लवकरच सुरू होऊन साताऱ्यातच रुग्णांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती शिवेंद्रसिंहराजे यांच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.