
सातारा : साताऱ्यात झालेल्या गुंतवणूक शिखर परिषदेत विविध कंपन्यांशी ९१ करार झाले. यातून जिल्ह्यात आगामी काळात ३९५० कोटींची गुंतवणूक होणार असून, त्यातून सुमारे ९७५० युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. पुणे विभागीय औद्योगिक संचालनालय आणि जिल्हा उद्योग केंद्र यांच्या वतीने हॉटेल फर्न येथे गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.