
सातारा : गावात ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या
सातारा : एकाच गावात ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याची मागणी होत होती. या पार्श्वभूमीवर एका तालुक्यात दहा किंवा दहापेक्षा जास्त वर्षे नोकरी करणारे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे प्रस्थापित ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतील बदल्यांची प्रक्रिया उद्यापासून (बुधवार) सुरू होत आहे. पहिल्याच दिवशी ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार होत्या. ग्रामसेवकांच्या बदल्या विनंती, आपसी बरोबर प्रशासकीय कराव्यात, असा निर्णय विनय गौडा यांनी घेत बुधवारच्या ग्रामपंचायत विभागाच्या बदल्या स्थगित केल्या आहेत. आता या बदल्यांसाठी नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. एका गावात किंवा तालुक्यात दहा किंवा दहापेक्षा जास्त वर्षे सेवा बजावलेल्या ग्रामसेवकांच्या प्रशासकीय बदल्या करण्याचे आदेश गौडा यांनी दिले आहेत.
जिल्ह्यात एक हजार ४९५ ग्रामपंचायती असून, ८३७ ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक कार्यरत आहेत. कोरेगाव ८१, खटाव ७१, माण ५५, फलटण ७४, खंडाळा ३९, वाई ६०, जावळी ६७, महाबळेश्वर ४४, कऱ्हाड १०४, पाटण १२९ अशी ग्रामसेवकांची नेमणूक आहे. काही ग्रामसेवकांकडे दोन,
Web Title: Satara Transfer Gram Sevaks Village
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..