esakal | कर्म माझं, सात तास रांगेत उभं राहूनही लस मिळाली नाही; ख-याची दुनिया नाय
sakal

बोलून बातमी शोधा

queue for vaccination in satara

कर्म माझं, सात तास रांगेत उभं राहूनही लस मिळाली नाही

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : लस (vaccine) आल्याचे आम्हांला बुधवारी रात्री समजले. आज पहाटे साडे चारला उठून पाचला कस्तुरबा गाठले. आमच्या आधी काही लाेक येथे येऊन थांबले हाेते. आम्हांला टाेकन वाटण्यात आली. सात तासानंतर आत्ता दुपारी पाऊण वाजता आम्हांला सांगितलं लस संपली. कर्म माझं. कसं हाेणार आता आमचं अशी भावना आमच्या मनात आली हाे. इथं वशिलेबाजीने काेराेनावरील लस (covid19 vaccine) दिली जाती. काय खरं नाही सामान्य नागरिकांचे असा टाहाे आज (गुरुवार) अनेक ज्येष्ठ नागरिकांनी कस्तुराबा रुग्णालय परिसरात फाेडला. तब्बल सात थांबून लस न मिळाल्याने नागरिकांचा गाेंधळ वाढल्याचे लक्षात घेऊन काेणी तरी पालिकेच्या मुख्याधिका-यांना (chief officer) बाेलाविले. त्यानंतर मुख्याधिका-यांनी लसीच्या प्रश्नावर नागरिकांना आश्वासन देत तात्पूरता ताेडगा काढला. satara-trending-news-covid19-vaccine-senior-citizens-abhijeet-bapat

गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली लसीकरणाची माेहिम आजपासून (गुरुवार) पुन्हा सुरु झाली. लस आल्याची माहिती बुधवारी माध्यमातून नागरिकांपर्यंत पाेचली. आज पहाटे पासून जिल्हा रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय तसेच गाेडाेलीमधील प्राथमिक आराेग्य केंद्र येथे लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या.

हेही वाचा: MPSC ने PSI च्या परीक्षा पॅटर्नमध्ये केला महत्वाचा बदल, आता 'असा' करा अभ्यास

काेविशिल्ड (covishield) आणि काेव्हॅक्सिन (covaxin) या दाेन्ही लस आल्याचे समजल्यानंतर अनेकांनी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या कस्तूरबा रुग्णालय येथे पहाटे चार पासून रांगा लावल्या. कार्यालयीन वेळेत नागरिकांना टाेक देण्यात आले.

दुपारी पाऊण वाजता काेव्हॅक्सिन लस संपल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. त्यामुळे सात तास थांबलेल्या नागरिकांपैकी काही ज्येष्ठ नागरिकांचा पारा चढला. हातात टोकन असूनही वशिलेबाजी करुन अन्य नागरिकांना लस देता का असा आराेप त्यांनी तेथील कर्मचा-यांवर केला. काहींनी तर अतिशय नियोजनशून्य कारभार असल्याचे म्हटले.

काही वेऴानंतर गाेंधळ वाढत गेल्याने अखेर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना बाेलाविण्यात आले. त्यांच्या पुढे नागरिकांनी तक्रारींचा पाढाच वाचला. बापट यांनी लाेकांना शांततेचे आवाहन करीत पुढील वेळी रांगेत न थांबता तुम्हांला प्राधान्याने लस देण्याची व्यवस्था करु असे सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला. दरम्यान शहरातील तिन्ही लसीकरण केंद्रावर वशिला असलेल्यांना लस दिली जाते अशी तक्रार वारंवार हाेत असल्याने आराेग्य विभागाने यावर मार्ग काढावा अशी अपेक्षा व्यक्त हाेऊ लागली आहे.

ब्लाॅग वाचा