कऱ्हाडातून घरी परतले 20 कोरोनामुक्‍त रुग्‍ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

कृष्णा हॉस्पिटलमधून कोरोनामुक्त झालेल्या नऊ, सह्याद्री हॉस्पिटलमधील एकास, तसेच पार्ले येथील कोरोना केअर सेंटरमधून दहा रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला. त्यांचा पालिकेच्या कोविड योद्‌ध्यांच्या हस्ते कृष्णा रुग्णालयात सत्कार करण्यात आला. 

कऱ्हाड (जि. सातारा) : कृष्णा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात उपचार घेणाऱ्या शेंडेवाडी - कुंभारगाव येथील 20 वर्षीय युवती, 18 वर्षीय युवक, तळबीड येथील 26 वर्षीय युवक, पालेकरवाडी-बहुले-पाटण येथील 50 वर्षीय पुरुष, वडूथ- सातारा येथील 63 वर्षीय पुरुष, खंडोबानगर (मलकापूर) येथील 30 वर्षीय महिला, 8 वर्षीय मुलगा, चचेगाव येथील 45 वर्षीय पुरुष, पालेकरवाडी-पाटण येथील 65 वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली. त्यामुळे त्यांना आज डिस्चार्ज मिळाला.

कृष्णा हॉस्पिटलमधून आजअखेर 273 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. कोविड 19 मुळे मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या येथील पालिकेतील कोविड योद्‌ध्यांच्या हस्ते सलग दुसऱ्या दिवशी कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्त रुग्णांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पालिकेचे मुकादम मारुती काटरे, रामचंद्र भिसे, अभिजित खवळे, प्रमोद कांबळे, अशोक दाईंगडे, नानासो सोनवले, संजय चावरे, बाबू चव्हाण यांचा समावेश होता. 

या वेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. विनायक राजे, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, संध्या जगदाळे, कविता कापूरकर आदींसह कर्मचारी उपस्थित होते. 

दरम्यान, सह्याद्री रुग्णालयातूनही मालखेड येथील एक जण कोरोनामुक्त झाल्याने त्यास आज डिस्चार्ज मिळाला, तसेच कोरोनाची लक्षणे न जाणवणाऱ्या मात्र पॉझिटिव्ह रुग्णांना प्रशासनाने पार्ले येथील कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले आहे. तेथील दहा जणांनाही डिस्चार्ज मिळाला. त्यामुळे कऱ्हाडमधून आज दिवसभरात 20 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज मिळाल्याचे प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी दिली. 
 

कोरोना मृत्यूदर रोखण्यासाठीचा साताऱ्याचा हा प्लॅन ठरू शकतो राज्यासाठी आयडॉल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Twenty Coronary Patients Returned Home From The Hospital In Karad