सातारा : घोरपडीची शिकारप्रकरणी दोघांना अटक

न्यायालयाकडून पाच दिवसांची कोठडी
Arrested
ArrestedSakal

सातारा: कुमठे (ता. सातारा) येथील उसाच्या शेतातील घोरपडीची शिकार करून घेऊन निघालेल्या फलटण तालुक्यातील दोघांना वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ ताब्यात घेतले. त्यांना अटक करून न्यायालयात दाखल केले असता पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुमठे परिसरातील उसाच्या शेतात असलेल्या घोरपडीची शिकार करून दोन जण रस्तावरून घेऊन निघाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

त्यानुसार वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन घोरपड घेऊन निघालेले भीमराव जयसिंग बनसोडे (रा. आरडगाव, ता.फलटण) व अमर अशोक तरडे (रा. मलवडी, पो. बिबवी, ता.फलटण) यांना ताब्यात घेतले. याबाबत संबंधितांकडे चौकशी केली असता त्यांनी घोरपडीची शिकार कुमठे (ता. सातारा) गावच्या हद्दीत दत्तात्रय अर्जुन चव्हाण यांच्या ऊस शेतात गावठी कुत्र्यांच्या मदतीने तसेच लाकडी काठी व कुऱ्हाडीच्या साह्याने शिकार केल्याची कबुली दिली. याप्रकरणी संबंधितांवर वन्यप्राणी/ वन्यप्राण्याचे मांस अनधिकृतपणे बाळगणे, शिकार करणे, वाहतूक करणे यास वन्यजीव संरक्षण अधिनियम कलमानुसार वन गुन्हा नोंद केला आहे. मृत घोरपड जप्त करून या दोघांवर अटकेची कारवाई केली.

त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या दोन्ही संशयितांना पाच दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक सुधीर सोनवले, वनपरिक्षेत्र अधिकरी डॉ. निवृती चव्हाण, वनपाल अरुण सोळंकी, कुशाल पावरा, वनरक्षक महेश सोनावले, सुहास भोसले, राजकुमार मोसलगी, श्रीमती साधना राठोड, श्रीमती अश्विनी

नरळे, मारुती माने, रोहोट यांच्या पथकाने केली.

दरम्यान, प्रत्येक वन्यप्राणी हा निसर्गाचा महत्त्‍वाचा भाग आहे. कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार करणे हा कायद्याने गुन्हा आहे. कोणीही असा वन गुन्हा करीत असल्यास तत्काळ वन विभागास संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) डॉ. निवृती चव्हाण यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com