Udayanraje Bhosale : शरद पवारांकडून पाडण्याची भाषा अशोभनीय : उदयनराजे भोसले
Satara News : मकरंद पाटील यांची वाई मतदारसंघात विकासकामे असून, त्याच्या जोरावरच ते चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याचे खा. उदयनराजे भोसले यांनी सांगितले. महायुतीने चार कॅबिनेट मंत्री दिल्याने जिल्ह्याला न्याय मिळेल.
Minister Makrand Patil paid a courtesy visit to JalmandirSakal
सातारा : राजकारणात शरद पवार यांच्या पाठीशी कायमच लक्ष्मणराव पाटील हे उभे राहून त्यांची पाठराखण केली. तरी देखील विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघात येऊन शरद पवार यांनी मकरंद पाटील यांना पाडण्याची केलेली भाषा अशोभनीय आहे.