सातारा : कऱ्हाडला आजपासून बांधकाम परवाने देण्याचा एकमताने ठराव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Building-Construction

सातारा : कऱ्हाडला आजपासून बांधकाम परवाने देण्याचा एकमताने ठराव

sakal_logo
By
(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड ः विमानतळ प्राधीकरणाचा हरकत सुचनेसह अंतीम नकाशा प्रसिद्ध होत नाही. तोपर्यंत बांधाकाम नियामवली नुसार कऱ्हाड पालिकेतर्फे बांधकाम परवाने द्यावेत. माझी वसुंधारातंर्गत अन्य उपक्रमासह वृक्ष लावण्यासह परवागी देण्याचा ठराव जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी आज पालिकेच्या मासिक सभेत मांडला. सबेत ठरावाला एकमातेन मंजरी दिली. उपाध्यक्ष जयवंत पाटील अध्यक्षस्थानी होती. विमानतळ अटीमुळे शहरातील विकासावर नांगर फिरणार असेल तर नागरीकांचे प्रतिनिधी म्हणून प्रसंगी विमानतळाची धावपट्टी जेसीबीने उखडून टाकू असाही इशारा यावेळी श्री. यादव यांनी दिला.

विमानतळ प्राधीकरणाने लावलेल्या अटीवरून पालिकेच्या आजाच्या मासिक सभेत जोरदार चर्चा झाली. विमानतळाची जाचक अट रद्द करण्याचा ठराव जनशक्तीचे गटनेते यादव यांनी मांडाला. श्री. यादव म्हणाले, विमानतळाच्या जाचक अटी मान्यच नाहीत. त्या अटी रद्द कराव्यात अन्यथा त्या विरोधात आम्ही भुमिका घेत आहोत. विमानतळाचा दर्जा कोणत्या प्रकारचा आहे, विमातळ अटीला वापरलेला अध्यादेश जुना आहे, धावपट्टीचा नकाशाच अद्याप अस्तीत्वात आहे का, तो कोणत्या साईटवर आहे. नकाशाच नसताना विमानतळाची अटीची अंमलबाजवमी का व कोणासाठी सुरू आहे, विमानळ संचालनालयाची येथील विमातळाला परवानगी आहे का, विमातळाच्या भूसंपादनाची प्रक्रीया पूर्ण झाली आहे का, शहराचा विकास आराखडा मंजूर आहे. त्यामुले ती अट डीपीला लागू होत नाही, या प्रश्नांची उत्तरे विमानतळ प्राधीकरणाडून अपेक्लाषीत आहेत.

हेही वाचा: Zomatoची सर्व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून माघार, वाचा कारण!

श्री. यादव यांना मांडलेल्या विषयावर लोकशाहीचे सौरभ पाटील, भाजपचे विनायक पावसकर, फारूक पटवेकर, विजय वाटेगावकर, हणमंत पवार, स्मीता हुलवान यांनी चर्चा केली. विमानतळाच्या जाचक अटी रद्द करण्यावर एकमत झाले. श्री. यादव यांनी अटी रद्दचा ठराव मांडला. ते म्हणाले, विमानतळाच्या अटीमुळे पालिकेने थांबवलेले बांधकाम परवाने उद्यापासून त्वरीत द्यावेत. माझी वसुंधरातंर्गत वृक्ष लावण्यासह अन्य उपक्रम सुरू करावेत. विमानतळाची अट अंतीम करताना पालिकेला विश्वासात घ्यावे. जाचक अटीमुळे शहरावर नांगर फिरणार असेल तर विमानतळाची धावपट्टी जेसीबीने उखडून टाकण्यास कमी पडणार नाही. विमानतळ अटीच्या ठरवासह जुन्या वॉटर वर्क्सची मुळ इमारत कायम ठेवून अन्य जागेत नागपंथी डवरी समाज, मराठा समाजाला समाज मंदी व स्वामी समर्थ बाल संस्कार व स्वयंरोजगार केंद्रालाही परवानगीचा ठराव झाला. विठामाता विद्यालयापासून मार्केट यार्डाकडे गेलेल्या रस्त्याला (स्व.) युनूस कच्छी यांचे नाव देण्याचा ठराव झाला. इदगाह मैदानात कमान उभी करून त्या कमानीला (स्व.) स्वातंत्र सैनिक बादशाह अली मुल्ला यांचे नाव देण्याचाही ठराव झाला.

loading image
go to top