फलटण शहर : निंबळकमध्ये महिलेचा खून

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जुलै 2020

घटनास्थळी सहायक जिल्हा पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सर्जेराव पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सावंत, बरडचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बोबले यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
 

फलटण शहर ः निंबळक (ता. फलटण) गावच्या हद्दीत एका महिलेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे फलटण तालुक्‍यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला असून, अज्ञात संशयिताविरोधात खुनाचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद केला आहे.
 
निंबळकमध्ये एका विहिरीमध्ये अज्ञात महिलेचा खून करून तिचा मृतदेह टाकल्याची माहिती पोलिस पाटील यांना मिळाली. पोलिस पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता एका लाल रंगाच्या चादरीमध्ये मृतदेह दोरीने बांधलेल्या स्थितीमध्ये असल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलिस पाटील यांनी याबाबतची माहिती फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. पोलिस निरीक्षक नितीन सावंत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. संबंधित विहिरीतील मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचा पंचनामा केला. हा मृतदेह 20 ते 25 वर्षे वयाच्या महिलेचा असून, तिच्या अंगावर काळ्या रंगाची फूल पॅंट व गुलाबी रंगाचा टी शर्ट आहे. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशीमध्ये विचारपूस केली; परंतु ओळख पटू शकली नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञाताने महिलेचा खून करून तिचा मृतदेह फलटण तालुक्‍यात आणून विहिरीत टाकल्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याबाबत सोलापूर, पुणे जिल्ह्यातील बेपत्ता असलेल्या महिलांबाबत माहिती घेतली जात आहे. याप्रकरणी निंबळक गावचे पोलिस पाटील यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन सावंत करीत आहेत. 

दरम्यान घटनास्थळी सहायक जिल्हा पोलिस अधीक्षक धीरज पाटील, जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख सर्जेराव पाटील, पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे, फलटण ग्रामीणचे पोलिस निरीक्षक सावंत, बरडचे सहायक पोलिस निरीक्षक संजय बोबले यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासासंबंधी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांची दुचाकीवरुन सवारी, वाळू माफियांचे धाबे दणाणले  

तुमच्या शेअर्सची परस्पर विक्री होत नाही ना? हे एकदा तपासाच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Unidentified Woman Found In Well Nimblak Near Phaltan