
वाई (जि. सातारा) : येथील प्रतापगड उत्सव समितीच्या निमंत्रक व बावधनच्या रहिवासी श्रीमती विजयाताई भोसले यांनी स्वतःच्या शेतातील उभा ऊस गाई- गुरांना चारा म्हणून करुणा मंदिर (वेळे) आणि शनेश्वर देवस्थान ट्रस्ट (सोळशी) येथील गोशाळांना मोफत उपलब्ध करून दिला. लॉकडाउनच्या कालावधीत श्रीमती भोसले यांनी गोशाळांना केलेली मदत मोलाची ठरली आहे.
वेळे येथील करुणा मंदिर गोशाळेतील, तसेच सोळशी येथील शनेश्वर देवस्थानतर्फे संचलित गोशाळेतील गाई व गुरांना चाऱ्याची तीव्र टंचाई भासत होती. लॉकडाउन व तीव्र उन्हाळा यामुळे चारा मिळण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. लॉकडाउन काळात माणसे कशीही जगवता येतात, मात्र जनावरांसाठी चारा मिळणे दुरापास्त झाले होते. ही समस्या जाणून श्रीमती भोसले यांनी गोरक्षण व गोसंवर्धनाचे व्रत पुढे सुरू ठेवण्यासाठी आपल्या शेतातील उभा ऊस दोन ट्रॉल्या भरून गोशाळांकडे स्वखर्चाने पाठवला व तेथील गाई व गुरांची होणारी उपासमार दूर केली.
या कामासाठी त्यांना बावधन येथील नीलेश भोसले, विकास मुळे यांनी सहकार्य केले. सुशील कदम, अनपटवाडी येथील किरण अनपट, शरद शिंदे यांनी वाहने उपलब्ध करून दिली. ऐन अडचणीच्या वेळी विजयाताई भोसले यांनी केलेल्या मदतीबद्दल करुणा मंदिर गोशाळेचे संचालक पोपटलाल ओसवाल व सोळशी येथील शनैश्वर देवस्थानचे नंदगिरी महाराज यांनी त्यांच्या सामाजिक मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, तसेच मुक्या जनावरांना ऐन अडचणीच्या वेळी चारा उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.