VIDEO : कराड–पाटण मार्गावर दारु पिऊन तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा; बोनेटवर बसून गाड्या अडवत घातला गोंधळ, दगडफेकही केली
Karad Patan Highway Incident : साताऱ्यात कराड-पाटण मार्गावर मद्यधुंद तरुणीने गाड्या अडवून, बोनेटवर बसून आणि दगडफेक करून गोंधळ घातला. या प्रकारामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
सातारा : साताऱ्यात कराड–पाटण राज्यमार्गावर (Karad Patan Highway Incident) एका मद्यधुंद तरुणीने भर रस्त्यात गोंधळ घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास विजयनगर येथील एमएससीबी चौकात हा प्रकार घडला.