esakal
सातारा : सातारा-रहिमतपूर रस्त्यावर (Satara-Rahimatpur Road) अंगापूर फाट्याजवळ काल (गुरुवार) दुपारी रस्त्याच्या मध्यभागी एक तरुण दोन हात आणि गुडघ्यावर रांगत, मध्येच श्वानासारखं दोन गुडघ्यांवर बसून दमल्यासारखं तोंडातून जीभ बाहेर काढत होता. हा प्रकार पाहून नागरिकांची भंबेरी उडाली. सोशल मीडियावरही (Satara Viral Video) या युवकाच्या वर्तनाची क्लीप व्हायरल झाली. त्यानंतर एकच खळबळ उडाली.