बेघर होण्याच्या भीतीने 12 कुटुंबियांनी दिला आत्मदहनाचा इशारा

कुडाळ
कुडाळ
Updated on

कुडाळ (जि. सातारा) : येथील इंदिरानगर वस्तीमध्ये गेल्या तीस वर्षांपासून शासनाने दिलेल्या घरकुल योजनेंतर्गत कुटुंबीयांसह वास्तव्यास असणाऱ्या एकूण 12 कुटुंबीयांना अतिक्रमणाच्या नोटिसा देऊन त्यांना जागा खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर संबंधित कुटुंबीयांनी बेघर होण्याच्या भीतीने शासनाकडे संबंधित यंत्रणेच्या विरोधात आत्मदहनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. 

या निवेदनावर योगेश विठ्ठल पवार, मोहन कुंडलिक पवार, धोंडिबा बंडू पवार, विलास पवार, अण्णा श्रीपती पवार, नाना बाळू भोसले, प्रकाश भोसले, दिनकर पवार, उत्तम शंकर पवार अशा एकूण बारा कुटुंबप्रमुखांच्या सह्या आहेत. 

निवेदनात म्हटले आहे, की आपल्याकडून बारा कुटुंबीयांना इंदिरा आवास योजनेंतर्गत गेल्या तीस ते चाळीस वर्षांपासून घरकुले दिली गेली. या जागेत घरकुल योजनेची घरे बांधण्यात आली आहेत. पण, ती जागा काही खासगी व्यक्‍तींकडून विकत घेण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीकडून मोजणी अंतर्गत हे घरकुल अतिक्रमणात आले असल्याचे तालुका मोजणी यंत्रणेला निदर्शनास आणून दिले आहे. मात्र, इंदिरा आवास योजनेचे घरकुल हे अतिक्रमणात नसून ती शासनाने दिलेली जागा आहे. त्यामुळे जर आम्हाला या जागेतून हलवण्यात आले तर संपूर्ण बारा कुटुंबीय आम्ही आत्मदहन करू, असा इशाराही बारा कुटुंबीयांतील नागरिकांनी दिला आहे. निवेदन देताना पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे यांच्यासह बारा कुटुंबीय उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Mahimangad Fort on the Path to Preservation; State-Protected Status Likely Soon
Karad Airport Modernization Faces Delays; Safety and Development Issues Under Scrutiny
Political Strategy in Full Swing Ahead of Council Polls; BJP Focuses on Securing Votes
Koyna Dam Water Levels Reach Critical Stage, Irrigation Withdrawals Stopped
Marathi News Esakal
www.esakal.com